पनीर टिक्का मसाला ( Paneer Tikka Masala )

साहित्य : ३ ते ४ स्क्यूअर्स (लोखंडी सळइ) , ३ ते ४ लहान हिरवा भोपळी मिरच्या  , ३ ते ४ छोटे कांदे , ८ ते १० छोटे लाल टोमॅटो (चेरी टोमॅटो) , २०० ग्राम पनीर , २ टेस्पून तेल , धणेपूड , जिरेपूड , लाल तिखट , घट्ट दही , १ टेस्पून कॉर्नस्टार्च , १/४ टिस्पून हळद , १ टिस्पून लाल तिखट , १ टिस्पून आलेलसूण पेस्ट , १ टिस्पून धणेजिरेपूड , चवीनुसार मीठ 

कृती :

  • १) मॅरीनेशनसाठीचे सर्व साहित्य एकत्र करून त्यात पनीरचे दिड इंचाचे तुकडे करून १५ ते २० मिनीटे मॅरीनेट करून ठेवा.
  • २) भोपळी मिरच्यांचे अंदाजे १ इंचाचे चौकोनी तुकडे करावे. कांदेची साले काढून अर्धे करून घ्यावेत.
  • 3) भाज्या चिरून झाल्या कि स्क्युअरमध्ये प्रथम एक टोमॅटो ओवून घ्या. नंतर २ तुकडे भाज्या आणि १ तुकडा पनीर असे ओवून सर्वात शेवटी परत टोमॅटो ओवावा.
  • ४) असे सर्व स्क्युअर्स तयार करून घ्या. 
  • ५) ओव्हन ब्रोईलवर २ ते ३ मिनीटे प्रिहीट करा.६)  तोपर्यंत  भाज्यांना तेल +मसाला मिश्रणाचे ब्रशिंग करावे. २ टेस्पून तेल, धणेपूड,  जिरेपूड, लाल तिखट, चिमूटभर मिठ एकत्र करून भाज्यांना अलगद हाताने किंवा पेस्ट्री ब्रशने लावावे.
  • ६) तयार स्क्युअर्स ओव्हनसेफ प्लेटला तेल लावून त्यावर ठेवावे आणि साधारण २ ते ४ मिनीटे बेक करावे.
  • ७) पनीर आणि भाज्या थोड्या ब्राऊन झाल्या कि ओव्हन बंद करून लगेच बाहेर काढाव्यात.
  • ८) स्क्युअर्स वरील भाज्या आणि पनीर हलक्या हाताने प्लेटमध्ये काढाव्यात .