पनीर मसाला ( Paneer Masala )

साहित्य : कांदा पेस्ट ,काजूपेस्ट , टोमॅटो प्युरी , १ टिस्पून धणेपूड , १ टिस्पून जिरेपूड , २ चिमूटभर कसूरी मेथी , १ टिस्पून लाल तिखट , १ टेस्पून बटर , १ टेस्पून आलेलसूण पेस्ट , चवीपुरते मिठ

कृती :

  • 1) प्रथम सर्व पेस्ट तयार करून घ्या. :- कांदा पेस्ट , काजू पेस्ट , टोमॅटो प्युरी
  • 2) पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आलेलसणाची पेस्ट परतावी. लगेच कच्च्या कांद्याची पेस्ट घालून मोठ्या आचेवर कांदा ब्राऊन होईपर्यंत परतावे.
  • 3) टोमॅटोची प्युरी घालून मध्यम आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईस्तोवर परतावे. नंतर परतलेल्या कांद्याची पेस्ट आणि काजूची पेस्ट घालून मिक्स करावे.
  • 4) यात धणे-जिरेपूड, कसूरीमेथी, लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालून दाटसर ग्रेव्ही बनवावी.
  • 5) हि पनीर मसाला ग्रेव्ही तुम्ही टिक्क्या वर पण टाकून सर्व्ह करू शकतात .