पनीर बटर मसाला ( Paneer Butter Masala )

साहित्य : १५० ग्रॅम पनीर , ३-४ टेबलस्पून बटर , २ मध्यम कांदे बारीक चिरलेले , २ चमचे आलं-लसूण पेस्ट , ५-६ तळलेले काजू , ३ टोमॅटो , १/२ टीस्पून गरम मसाला , १ १/४ टीस्पून धनेपूड , १ टीस्पून जिरे पूड , १ टीस्पून लाल तिखट (बेडगी) , १ टीस्पून हळद , १ टीस्पून कसुरी मेथी चुरडून , १/४ कप जाडसर क्रीम , मीठ आणि साखर चवीप्रमाणे

कृती :

  • १) पनीरचे चौकोनी तुकडे करून बटरवर मध्यम फ्राय करून घ्या.
  • २) टोमॅटोची जाड प्युरी करून ठेवा. 
  • ३) कढईत २ टेबलस्पून बटर गरम करा. त्यातच १ चमचा तेल घाला. मग आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परता. नंतर कांदा घालून शिजेपर्यंत परता.
  • ४) कांदा शिजला कि, त्यात हळद,तिखट,गरम मसाला,धने-जिरे पूड आणि किंचित मीठ घालून छान वास सुटे पर्यंत परतून घ्या. गॅस बंद करा.
  • ५) हे सगळे मिश्रण आणि तळलेले काजू एकत्र करून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास पाणी न घालता थोडीशी टोमॅटो प्युरी घालून वाटा.
  • ६) आता पुन्हा कढईत १ टेबलस्पून बटर गरम करा आणि वाटलेला कांदा आणि काजूची पेस्ट घालून २-३ मिनिटे परता.
  • ७) मग टोमॅटो प्युरी,मीठ आणि साखर  घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवून ८-१० मिनिटे ग्रेवी  शिजवत ठेवा. कसुरी मेथी घाला आणि गॅस बंद करा.
  • ८) पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.झाकण ठेवून ५-७ मिनिटांनी वरून क्रीम घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा.
  • ९)  वरून कोथिंबीर नी सजवा आणि पराठा किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा