पनीर भुर्जी ( Paneer Bhurji )

साहित्य : शंभर ग्रॅम पनीर , २ ते ३ मध्यम कांदा बारीक चिरलेले , २ ते ३ टोमाटो बारीक चिरलेले , एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट , हळद , लाल तिखट मसाला , थोडी कोथिंबीर , एक टेबल स्पून तेल , चवीनुसार मीठ

कृती :

  • १)      तेलात कांदा फ्राय करावा .  त्यात आले-लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे .  नंतर टोमाटो टाकून परतून घ्यावे . 
  • २)     टोमाटो नरम झाला की त्यात पाव चमचा हळद , अर्धा चमचा लाल तिखट , अर्धा चमचा गरम मसाला टाकून मीठ टाकावे . 
  • ३)     पनीर बारीक कुस्करून त्यात टाकावे व चांगले ढवळून वाफ काढावी .  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .