पालक पनीर ( Palak Paneer )

साहित्य : ५० ग्रॅम पनीर , १ जुडी पालक – अंदाजे  २०० ग्रॅम , १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट , १/२ कप किसलेला / बारीक चिरलेला कांदा , २ चिमुट गरम मसाला , १-२ हिरव्या मिरच्या , १/४ टीस्पून हळद , १/४ टीस्पून धनेपूड , १/४ टीस्पून जिरेपूड , १/४ टीस्पून आमचूर , १ टेबलस्पून दही , १ टेबलस्पून चीज  , २ टेबलस्पून तेल , मीठ चवीप्रमाणे

कृती :

  • १) पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत .
  • २) गरजेनुसार पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. पाणी उकळले कि त्यात पालकाची पाने घाला. चिमुटभर मीठ घाला. ४ ते ५ मिनिटे पाने पाण्यात शिजू द्या.
  • ३) शिजलेला पालक (उरलेल्या पाण्या सकट)  आणि  हिरव्या मिरच्या  मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.
  • ४) पनीरचे चौकोनी तुकडे करून ठेवा . १ चमचा बेसन किंवा तांदळाच्या पिठात २ चमचे  पाणी घाला. आणि त्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवा आणि थोड्याश्या तेलात पनीर शालो फ्राय करून ठेवा .
  • ५) एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. खमंग वास सुटला कि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
  • ६) त्यानंतर धने-जिरे पूड ,गरम मसाला आणि १/४ चमचा हळद घालून हे मिश्रण परतून घ्या .
  • ७) मिक्सर मध्ये वाटलेला पालक घाला. आमचूर घालून एक उकळी काढा.
  • ८) गरज्वात्ल्यास किंचित पाणी घाला.आणि मग १ टेबलस्पून दही घालून नीट ढवळून घ्या .
  • ९) १ टेबलस्पून किसलेले चीज घाला.
  • १0) ह्या ग्रेवी मध्ये सर्व्ह करायच्या ५ ते १० मिनिटे आधी पनीर घाला. खूप आधी पनीर टाकून ठेवल्यास पनीरचा लगदा होऊन पनीर मोडण्याची शक्यता असते.