मटर पनीर ( Matar Paneer )

साहित्य : २५० ग्राम पनीर , १ कप हिरवे मटर , १ मोठा कांदा चिरलेला , ४ मध्यम टोमॅटो चिरूलेला गरम मसाला , २ टिस्पून आलेलसूण पेस्ट , ४-५ काजू  , मिठ चवीप्रमाणे  , २ टेस्पून दही , कोथिंबीर१ टिस्पून धणेपूड , १/२ टिस्पून जिरेपूड , १/२ टिस्पून आमचुर पावडर , १/२ टिस्पून जिरे , १ हिरवी मिरची , १/४ टिस्पून हळद , १-२ टिस्पून लाल तिखट , ३ टेस्पून तेल

कृती :

  • १) पनीरचे तुकडे थोड्या तेलात, नॉनस्टीक पॅनमध्ये शालो फ्राय करून घ्यावेत.
  • २) एका भांड्यात २ चमचे  तेल गरम करावे. त्यात काजू घालून थोडे फ्राय करून  घ्या 
  • ३). तेला मध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.  कांदा शिजला कि हळद आणि आलेलसूण पेस्ट टाका .थोडावेळ परतून बारीक चिरलेला टोमॅटो यात टाकावा  .
  • ४) थोड्या वेळानंतर  नंतर हे मिश्रण मिक्सरवर थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या.
  • ५) पॅनमध्ये १ -२ चमचे  तेल गरम करा,  त्यात गरम मसाला मध्यम आचेवर १०-१५ सेकंद परतून घ्या . त्यात वेलची आणि जिरे घालावे. आता यामध्ये  मिक्सरवर वाटलेले मिश्रण टाका व थोडे पाणी पण टाका . 
  • ६) धणेजिरे पूड आणि लाल तिखट मिश्रणामध्ये टाका . मध्यम आचेवर ५-७ मिनीटे उकळी काढून घ्या .
  • ७) आता भांड्यात हिरवी मिरची आणि  हिरवे मटार घालून काही मिनीटे उकळी काढावी. 
  • ८) सुरुवातीला फ्राई केलेले पनीरचे तुकडे घालावेत . दही घालून मिक्स करावे. 
  • ९) सजावटी साठी कोथिंबीर नंतर त्यामध्ये टाकू शकतात .