काजू मसाला ( Kaju Masala )

साहित्य : ओले काजू  , एक वाटी ताजं खवलेलं खोबरं , पाव किलो कांदे , थोडी कोथिंबीर , तीन मोठे चमचे तेल (तूप) , सात-आठ लसूण पाकळ्या , जरासं आलं , लिंबाएवढी चिंच , चवीनुसार मीठ , दोन चमचे सांबर मसाला , अर्धा चमचा हळद , आठ काळ्या लवंगा , थोडी दालचिनी , जरासं जायफळ , चमचाभर धने , अर्धा चमचा मिरपूड . 

कृती :

  • १)      ओले काजू दोन तास पाण्यात भिजवून सोलून घ्या .  कांदे लांब चिरून घ्या . 
  • २)      सोललेले काजू स्वच्छ धुवून साधारण बारीक चिरून घ्या .  कढाईत तेल     गरम करून घ्या . 
  • ३)      त्यात थोडासा चिरलेला कांदा परतून घ्या .  नंतर त्यातच खवलेलं          खोबरं भाजून घ्या . 
  • ४)      मिरची पूड , हळद , मिरपूड त्यात टाकून मिश्रण चांगलं ढवळून निवत ठेवा . 
  • ५)      गैसवर पातेलं गरम करून त्यात दोन मोठे चमचे तेल गरम करून राहिलेला   कांदा परतून घ्या . 
  • ६)      त्यात चिरलेले ओले काजू टाकून मंदाग्नीवर शिजेपर्यंत ठेवा . 
  • ७)      काजू शिजले की त्यात वरचं मिश्रण पाट्यावर अथवा मिक्सरमध्ये बारीक    वाटून घाला . वाटताना त्यात चिंचेचा कोळ , कोथिंबीर पण वाटून घ्या . 
  • ८)      तीन वाटया पाणी घालून उकळी आल्यावर मंदाग्नीवर पाच मिनिटं ठेवा .  चवीपुरतं मीठ टाका .